Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

महिलांना मिळणार दरमहा १५०० रुपये.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ ही योजना जाहीर करून, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना एक अनोखी गोड बातमी दिली आहे. वय वर्ष २१ ते ६० पर्यंत दर महिन्याला महिलांना या योजने द्वारे १५०० (दीड हजार रुपये) मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली आहे. अर्थसंकल्प २०२४-२०२५ विधान भवनात सादर करण्यात आला. ज्यामध्ये Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 ची घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे महिला सक्षमिकरणाला मदत होऊन महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल यासठी राज्य सरकारने हे एक चांगल पाउल उचलल आहे.

महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 . मध्यप्रदेशातील “लाडली बहना” या योजनेवरून प्रेरित आहे. सुरुवातीला या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० दीड हजार रुपये देण्यात येतील तसेच या योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने हि रक्कम ३००० तीन हजार रुपये केली जाईल, असे सांगून महिलांना आत्मनिर्भर व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाउल सिद्ध होईल असही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून सुरु होईल .जर तुम्ही महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्र राज्यातील महिला असाल आणि Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजने साठी ची पात्रता:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असाव्या लागणाऱ्या पात्रता खालीलप्रमाणे आहेत

१) अर्जदार हि महिला असावी आणि ती महाराष्ट्र राज्याची मुळ रहिवाशी असावी.

२) अर्जदार महिलेचे वय कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ६० वर्ष असावे.

३) या योजनेत गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गातील निराधार तसेच विधवा महिलांना प्रर्थामिकता दिली जाईल.

४) वार्षिक उत्पन्न : – अर्जदार महिलेच्या कुटुंबातील वार्षिक आर्थिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. तसेच महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करणारा नसावा. व आय कर भरणारा नसावा.

५) अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड तसेच मोबाइल नंबर शी जोडलेले असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचे पैसे कधी मिळणार ? :- जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही. जसे कि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेनुसार Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 चा लाभ जुलै महिन्यात लाभार्थ्यांना मिळण्यास सुरुवात होईल.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाण पत्र
  • उत्पन्न प्रमाण पत्र
  • जात प्रमाण पत्र ( लागू असल्यास)
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर ( आधार शी लिंक असलेला)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पासपोर्ट साईज फोटो Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 लाभार्थी निवड प्रक्रिया , महाराष्ट्र शासनाने Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 हि योजना मध्यप्रदेश राज्यातील “लाडली बहना” या योजनेच्या दर्तीवर आणि तसेच उद्देश डोळ्यासमोर धरून सुरु केली असल्यामुळे, महिलांना आर्थिक सक्षम बनवून आत्मनिर्भर बनवणे ये या योजनेचे उधिष्ट असल्यामुळे या योजनेमध्ये निवड ल्या जानार्या सर्व लाभार्थी महिलांना या लाभाची रक्कम रुपये १५०० (दीड हजार रुपये) हि थेट त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील जवळपास १.५ कोटी (दीड कोटी) महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 अर्ज प्रक्रिया :- जस कि आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवाशी २१ ते ६० वयोगटातील कुठलीही महिला या योजनेत सहभागी होऊन लाभार्थी ठरू शकते. या साठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. तसेच “नारीशक्ती दूत अप” या मोबाइल अप वरूनही तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरा.

  • Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा अर्ज करण्यासाठी मोबाइल मध्ये प्ले स्टोअर वर जा
  • प्ले स्टोअर वर गेल्यावर “नारीशक्ती दूत अप” अस सर्च करा. अप सापडल्यावर त्यावर क्लिक करा आणि इंस्टाल बटन वर क्लीक करा.
  • यानंतर नारीशक्ती दूत अप आपल्या मोबाईल वर इंस्टाल होईल त्याला ओपन करा. आणि मोबाइल नंबर टाकून लोग इन करा.
  • आता तुमच्या समोर लाडकी बहिण योजनेचा अर्ज ओपन होईल.
  • त्यात विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा. व योजनेचा लाभ घ्या.