Mahila sanmaan bachat patra yojana

Mahila sanmaan bachat patra yojana|महिला सन्मान बचत पत्र योजना.


Mahila sanmaan bachat patra yojana

Mahila sanmaan bachat patra yojana

visit this official site

महिला सन्मान बचत पत्र योजना २०२४:- भारत सरकार च्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी महिला आणि मुलींसाठी एक लघु बचत योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत महिला सन्मान बचत पत्र योजना या मध्ये सहभागी महिला बँक किंवा पोस्टात खाते खोलून २ लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि यावर वार्षिक ७.५ टक्के व्याजदर मिळवू शकतात. या योजनेचा लाभ खाते सुरु केल्यापासून पुढील २ वर्षापर्यंत घेतला जाऊ शकतो. आणि यामध्ये १००० रुपयापासून गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

  1. महिला सन्मान बचत पत्र योजना काय आहे ?
  2. महिला सन्मान बचत पत्र योजनेचे उद्देश
  3. महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे
  4. महिला सन्मान बचत पत्र योजनेतून किती पैसे मिळणार ?
  5. महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता
  6. महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी लागणारे कागदपत्र
  7. Mahila sanmaan bachat patra yojana यासाठी अर्ज कसा करावा ?
  1. महिला सन्मान बचत पत्र योजना काय आहे ?

बजेट २०२३ मध्ये अर्थ मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी Mahila sanmaan bachat patra yojana या संबंधी अधिसूचना केली होती. आणि त्यांनतर लगेचच १ एप्रिल पासून हि योजना सुरु करण्यात आली. या योजने माधे कोणत्याही वयोगटातील महिला कोणत्याही उत्पन्न गटा अंतर्गत २ लाख रुपयापर्यन्तची रक्कम गुंतवू शकते. या योजने अंतर्गत महिला १००० ( एक हजार रुपये) रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आपले पैसे गुंतवून बचत करू शकते. या योजने मध्ये गुंतवलेली रक्कम हि करमुक्त असेल व त्यावर ७.५ (साडेसात) रुपये टक्के या व्याजदराप्रमाणे व्याज सुद्धा दिले जाईल. योजनेचा कालावधी २ वर्षाचा आहे तर व्याजदर परतावा हा ७.५ टाके एव्हढा आहे. या योजनेतील गुंतवणूक दाराला व्याज मासिक हप्त्याने जमा केले जाते आणि २ वर्षाचा गुंतवणूक कालावधी संपल्या नंतर व्याजासहित मूळ रक्कम परत केली जाते.

जर तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजना २०२४ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर योजनेचे फायदे, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्र आणि संबधित सर्व माहिती खाली दिलेली आहे.

2.महिला सन्मान बचत पत्र योजनेचे उद्देश :

महिला सन्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम बनवणे. या योजने अंतर्गत सर्व महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते व त्यांना आर्थिक गुंतवणुकीत सामील केले जाते. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर बनतील आणि महिलांप्रती होणारी हिंसा आणि बेद्भाव रोखला जाईल. हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे.

3.महिला सन्मान बचत पत्र योजनेचे फायदे :

या योजने मध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिला आपल्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतात. महिला आपल्या छोट्याश्या बचतीतून गुंतवणुक करून चांगल्या प्रकारचा व्याजदर प्राप्त करू शकतात. या योजनेत दोन वर्षाच्या कालावधीसाठी कोणतीही महिला रुपये २००००० पर्यंत गुंतवणूक करू शकते. मग ती राकाम छोट्या छोट्या हप्त्याच्या स्वरूपात असेल किंवा एकदम २ लाख हि जमा केली जाऊ शकते.

4. महिला सन्मान बचत पत्र योजनेतून किती पैसे मिळणार ?

महिला सन्मान बचत पत्र योजनेतून २ लाख रुपये गुंतवणूक करून २ लाख ३२ हजार रुपये मिळवता येतात.

जमा केलेली रक्कम 2 वर्षानंतर मिळणारी रक्कम
1000 रुपये 1160 रुपये
2000 रुपये2320 रुपये
3000 रुपये3481 रुपये
5000 रुपये5801 रुपये
10000 रुपये11606 रुपये
20000 रुपये23204 रुपये
50000 रुपये 58011 रुपये
1 लाख रुपये 1 लाख 16 हजार 22 रुपये
2 लाख रुपये2 लाख 32 हजार 44 रुपये

5. महिला सन्मान बचत पत्र योजना पात्रता:

  • भारतात राहणाऱ्या सर्व महिला व मुली Mahila sanmaan bachat patra yojana या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • यासाठी अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे किंवा मुलीचे वय हे कमीत कमी १८ वर्ष असावे त्यापेक्षा अधिक कितीहि असले तरी चालेल.
  • तसे पाहता या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही. मात्र असे असले तरी बँकेत खाते उघडण्यासाठी एका अनुमोदाकाची गरज असेल.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • महिलेच्या संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न मिळून ७ लाखापेक्षा जास्त असावे. तेव्हाच या योजनेची ती महिला लाभार्थी होऊ शकते.
  • या योजनेत कोणत्याही जाती, धर्म आणि वर्गातील महिला अर्ज करू शकते.

6. महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी लागणारे कागदपत्र:

  • आधार कार्ड
  • पैनकार्ड
  • ओळखपत्र
  • मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेचा अर्ज

7. Mahila sanmaan bachat patra yojana यासाठी अर्ज कसा करावा ?

Mahila sanmaan bachat patra yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सरकारी बँक किंवा पोस्त ऑफिस मध्ये जावे लागेल. तिथे या योजनेचे अर्ज उपलब्ध करून त्यात योग्य ती माहिती भरून, वर नमूद केलेली कागदपत्रे जोडून पोस्ट किंवा बँकेत जमा करावे लागेल.

जेंव्हा तुम्ही अर्ज कराल तेंव्हा तुम्हाला जेव्हढी रक्कम जमा कारायची आहे, ती तुम्ही निवडू शकता. तसेच चेक ने किंवा रोख स्वरूपात किंवा उपलब्ध असल्यास online पद्ध्तीने हि रक्कम जमा केली जाऊ शकते. जेंव्हा तुम्ही रक्कम जमा कराल तेंव्हा तुम्हाला एक रक्कम जमा केल्याची पावती मिळेल. जि तुमच्या गुंतवणुकीचा पुरावा असेल.

हेही वाचा:- संपूर्ण प्राचिन भारताचा इतिहास

Please follow and like us:
Pin Share
RSS
Follow by Email