प्राचिन भारताचा इतिहास मराठीत | History of India |Indian History In Marathi
तुम्ही विद्यार्थी असा अथवा नसा भारतीय असा अथवा नसा भारताचा इतिहास अभ्यासने, जाणून घेणे किंवा वाचणे हि एक वेगळीच अनुभूती आहे. नमस्कार मी जयराम कदम घेऊन आलोय संपूर्ण भारताचा इतिहास शुद्य मराठीत आणि अतिशय माफक शब्दात जर तुम्हाला हा विषय कंटाळवाणा वाटत असेल तर एकदा हा लेख वाचायला सुरुवात करा आणि मी ग्यारंटी देतो कि तुम्ही पूर्ण वाचल्याशिवाय इथून जाणार नाही. आणि जर तुम्ही पूर्ण वाचलाच तर पुढील लेख लिहिण्यासाठी शुभेच्छा नक्की द्या. आपला अधिक वेळ न घेता थेट जाऊया…….
भारताचा इतिहास चा अभ्यास करतांना सर्वात आधी अभ्यासावा लागतो तो प्राचिन भारताचा इतिहास, हा प्राचिन भारताचा इतिहास प्रामुख्याने ३ भागात विभागाला जातो त्यामध्ये,
१. अश्मयुग, २. ताम्रापाषण युग, ३. महापाषण युग. हे तीन भाग आहेत.
१. अश्मयुग :-इसवी सन पूर्व ५०००० (पन्नास हजार) ते इसवी सन पूर्व १५०० (दीड हजार) असा जवळपास ४८५०० (अठ्ठेचाळीस हजार पाचशे) वर्षाचा प्रदीर्घ कालखंड अश्मयुग अस्तित्वात होते. अश्मयुग हे सुद्धा प्रामुख्याने ३ भागात विभागले जाते.१) पुराणाश्म युग २) मध्याश्मयुग ३) नवाश्मयुग अश्म म्हणजे दगड, ज्या कालखंडात दगडाचे हत्यार वापरून शिकार करून मानव उपजीविका करत असे त्या कालखंडाला किंवा युगाला अश्मयुग असे म्हणतात. मात्र दगडी हत्यार हे तीन प्रकारात वापरले गेले पहिल्यांदा ओबडधोबड दगडी हत्यारे वापरली गेली तो कालखंड म्हणजे पुराणाश्म युग. दुसर्या प्रकारात माणूस थोडा प्रगत झाला तेंव्हा त्याने तीक्ष्ण दगडी हत्यारे तयार केली आणि त्याचा वापर केला. या कालखंडाला किंवा युगाला मध्याश्मयुग म्हंटले जाते. तर माणूस आणखी प्रगत झाल्यावर त्याने अतिशय तीक्ष्ण हत्यारांचा शोध लावला आणि त्याचा वापर करून शिकार करून आपली उपजीविका भागू लागला, म्हणून या कालखंडाला किंवा युगाला नवाश्मयुग म्हंटले जाते.
१) पुराणाश्म युग २) मध्याश्मयुग ३) नवाश्मयुग
पुराणाश्म युग :- इसवी सन पूर्व ५०००० (पन्नास हजार) ते इसवी सन पूर्व ९००० (नऊ हजार)[साधारण ४१०००- एक्केचाळीस हजार वर्ष] या कालखंडास पुराणाश्म युग असे म्हणतात, यालाच हिमयुग असेही म्हणतात. कारण या काळात पुर्थ्वीवर जास्तीत जास्त बर्फाचे प्रमाण होते. या काळात मानवाने शिकार करून उदरनिर्वाह करण्याची कला अवगत केली होती आणि ती शिकार करण्यासाठी ओबडधोबड दगडी हत्यारे वापरली जाऊ लागली आणि याच कारणामुळे या कालखंडाला पुराणाश्म युग असे म्हंटले जाऊ लागले. भारताच्या इतिहासात या युगातील पुरावे भारताच्या विविध ठिकाणी सापडलेले आहेत. त्यापैकी शोण नदी चे पात्र, बेलन नदी चे पात्र, तुंगभद्रा नदी चा प्रदेश, थर चे वाळवंट, उत्तरप्रदेश मधील मिर्झापूर, राजस्थान मधील दिंडवाना, मध्यप्रदेश मधील भीमबेटका गुफा या सर्व ठिकाणी पुराणाश्म युग / हिमयुग यांचे पुरावे सापडलेलेले आहेत.
मध्याश्म् युग : – इसवी सन पूर्व ९००० (नऊ हजार) ते इसवी सन पूर्व ४००० (चार हजार)[साधारण ५०००- पाच हजार वर्ष] या कालखंडास मध्याश्म् युग असे म्हणतात. हिमयुगाचा शेवट झाल्यानंतर मध्याश्म् युग ची सुरुवात होते. या काळात मानवाने थंड ठिकाणाहून उष्ण ठिकाणी स्थलांतर केले. याच काळात मानवी बुद्विधी थोडीसी विकसित झाली आणि मागील साधारण ५० हजार वर्ष ओबडधोबड दगडी हत्यारे वापरून शिकार करणार्या मानवाने, तीक्ष्ण दगडी हत्याराचा शोध लावला, आणि त्याचा वापर करू लागला. त्यामुळे या कालखंडास मध्याश्म् युग असे म्हणतात. उत्तरप्रदेश मधील बेलन नदी चे पात्र, राजस्थान मधील बागोर, मध्यप्रदेश मधील आदमगड अश्या काही ठिकाणी भारतात या युगाचे पुरावे सापडलेले आहेत. या युगाच्या शेवटी मानवाने प्राणी पाळण्यास सुरुवात केली होती. आणि याच काळात अग्नीचा सुद्धा शोध लागला होता .
नवाश्मयुग: – इसवी सन पूर्व 4000 (चार हजार) ते इसवी सन पूर्व १५०० (दिड हजार) [साधारण २५००- अडीच हजार वर्ष] या कालखंडास नवाश्मयुग असे म्हणतात. मानव आणखी-आणखी प्रगत झाल्यावर त्याने अतिशय तीक्ष्ण हत्यारांचा शोध लावला आणि त्याचा वापर करून शिकार करून आपली उपजीविका भागू लागला, म्हणून या कालखंडाला किंवा युगाला नवाश्मयुग म्हंटले जाते. मात्र हा कालखंड जगभरात सर्व ठिकाणी सारखा नाही. भारतात याची काही पुरावे खालील ठिकाणी सापडलेले आहेत. जम्मू काश्मीर मधील बृझोम आणि गृफ्क्राल, बिहार मधील चीरांद, मेघालय मधील गारो टेकड्या, उत्तरप्रदेश मधील मिर्झापूर, तामिळनाडू मधील पथमपल्ली ,आंध्रप्रदेश मधील उतनुर, कर्नाटक मधील म्हस्की, ब्रम्हगिरी, दान्नुर, कोडकल, संगत, कन्नू, टी नरस्पूस , पिकलीहल इत्यादी. नवाश्मयुगात शेतीला सुरुवात झाली. भटके जीवन संपून गाव वसाहत सुरु झाली. जगात चार ठिकणी याचे पुरावे आढळलेले आहेत १. मेसोपोटेमिया २) इजिप्त ३) चीन ४) भारतीय उपखंड
१. मेसोपोटेमिया :- मेसॉस म्हणजे मधला आणि पोटोमास म्हणजे नदी, दोन नद्यांमधील प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया होय. टायग्रीस आणि युक्रीटीस या दोन नद्यांमधील प्रदेशात इ स वी सन पूर्व १०००० (दहा हजार) या काळात नवाश्मयुग अस्तित्वात होते. याच काळात येथे गाव वसाहत आणि शेतीची सुरुवात झाली. गहू आणि बार्ली हे पिक त्या काळात घेतले जात होते. हे ठिकाण आज इराक व सिरीया या देशात विभागलेले आहे.
२) इजिप्त:- इजिप्त मध्ये इ स वी सन पूर्व ६००० (सहा हजार) या काळात नाईल नदी च्या काठावर नवाश्मयुग अस्तित्वात होते. या ठिकाणी सुद्धा त्या काळात गहू आणि बार्ली हि पिके घेली जात असे.
३) चीन :- इ स वी सन पूर्व ७००० (सात हजार) या कालखंडात चीन मधील हो यांग हो नदी (येल्लो रिवर किंवा पिवळी नदी) च्या काठावर नवाश्मयुग अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडलेले आहेत. त्या ठिकाणी मात्र बार्ली ऐवजी राळ व भात हि पिके घेतली जात असल्याचे आढळून आले आहे. तर गहू हा सगळ्याच चारही ठिकाणी आढळतो.
४) भारतीय उपखंड :- सिंधू नदी च्या काठी इ स वी सन पूर्व ८००० (आठ हजार) या काळात तसेच याच काळात गंगा नदी च्या काठावर सुद्धा मात्र अल्प प्रमाणात नवाश्म युग असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणीही शेतीमध्ये बार्ली आणि गहू ही पिके घेतली जात असे. पाकीस्तान मधील मेहेरगड या ठिकाणी सुद्धा इ स वी सन पूर्व ७००० (सात हजार) या कालखंडातनवाश्मयुग अस्तित्वात होते. महाराष्ट्र मध्ये नवाश्मयुगीन स्थळे मिळाली नाहीत. या ठिकाणी मध्याश्मयुग नंतर थेट ताम्रपाषाण युगाची सुरुवात झाली.
ताम्रपाषाण युग :- नवाश्म युगाच्या शेवटी तांब्याचा शोध लागला आणि तिथून पुढे शिकार करण्यासाठी लागणारी हत्यारे हि तांबे आणि दगड या दोन्ही साधनांपासून तयार होऊ लागल्याने या युगास ताम्रपाषाण युग म्हंटले जाते. या काळात मानव मांसाहार करण्यासाठी गाई, बैल, शेळी, म्हैस हे प्राणी पाळू लागला. तोपर्यंत दुधाच्या वापराबद्दल मानवाला माहिती नव्हती. घोडा हा प्राणी सुद्धा मानवाला माहित नव्हता. या काळामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, मसूर हि पिके घेतली जात होती. गोल आकाराची घरे बांधून मानव राहू लागला होता. याच काळात मानवाला कापड बनवण्याची कला अवगत झाली. या काळातील मानव स्त्री देवतांचे उपासक असल्याचे दिसून येते. टेरीकोटा नामक मातीच्या स्त्रीदेवतांच्या मूर्ती बनवून त्याची ते उपासना करत. या काळात लेखन कला अवगत झालेली नव्हती. शेती करतांना नांगराचा वापर होत नव्हता.
भारतात तुटकपणे ताम्रापाषण युग संस्कृती आढळते. भारतात त्याची स्थळे देखील मिळालेली आहेत. पश्चिम भारतामध्ये अदर, सिकर, गीलुंड तर पूर्व भारतामध्ये चीरांद, सेनुर, सोनापूर पांडूराजर डीबी तर महाराष्ट्रात नेवासे, दायमाबाद., चांदोली, जोर्वे, सोनगाव, ईमानगाव, प्रकाशे आणि नाशिक.
यातही ठिकाणानुसार ताम्रपाषाण संस्कृती हि चार भागात विभागली जाते १. कायथा संस्कृती २. अहाड संस्कृती ३.माळवा संस्कृती ४. जोर्वे संस्कृती.
१. कायथा संस्कृती : मध्यप्रदेश मधील चंबळ नदी ची उपनदी असणाऱ्या सिंध नदी व काली नदी या दोन नद्यांच्या प्रदेशात कायथा संस्कृती हि ताम्र्पाषण युगीन संस्कृती आढळून आलेली आहे.
२. अहाड संस्कृती : राजस्थान मध्ये खेत्री खानआणि तांबा या ठिकाणी अहाड संस्कृती हि ताम्र्पाषण युगीन संस्कृती आढळून आलेली आहे.
३.माळवा संस्कृती : हि सुद्धा मध्यप्रदेश मधील माळवा तसेच कर्नाटक या ठिकाणी आढळून आली.
४. जोर्वे संस्कृती: महाराष्ट्र मध्ये मुख्यत: अहमदनगर मध्ये सर्वात नवीन जोर्वे संस्कृती अस्तित्वात होती जिचा विस्तार तापी नदी – गोदावरी नदी –भीमा नदी असा होता.
महापाषाण युग
महापाषाण युग : व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याचे दफन करून त्याच्याभोवती मोठमोठे दगड रोवायचे त्यावरून या युगास महापाषाण युग असे नाव पडले. या युगाची स्थळे जगभर आढळतात. या युगाचा भारतातील कालखंड इ स वी सन पूर्व १५०० (पंधराशे) ते इ स वी सन पूर्व 500 (पाचशे) वर्षे असा आहे. तर महाराष्ट्रातील कालखंड इ स वी सन पूर्व १००० (एक हजार) ते इ स वी सन पूर्व ४०० (चारशे) वर्षे असं आहे. भारत मध्ये ओडिशा राज्यातील बोडो जमातीमध्ये, दक्षिण भारत मध्ये तोडो आणि कुरुंब तर ईश्यान भारत मध्ये नागा आणि खासी या जमातीमध्ये आजही व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याला दफन करून त्याच्या भोवती मोठमोठे दगड रोवले जातात. तर महाराष्ट्र मध्ये नागपूर मधील नायकुंड तसेच चंद्रपूर आणि भंडारा या ठिकाणी याच कालखंडातील म्हणजेच महा पाषाण युगीन लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडलेली आहे. तसेच जे समाधी स्थळ हे लोक बनवत असे ते रस्त्याच्या कडेला अर्थात व्यापारी मार्गावर आढळून आले आहेत यावरुन त्याकाळातील लोक हे व्यापारी होते आणि ते सतत स्थलांतर करत असल्याचे दिसून येते.
तर अश्या पद्धतीने आपण प्राचिन भारताचा इतिहास समजून घेतला आता आपल्याला पुढील लेखात हडप्पा संस्कृती आणि वैदिक संस्कृती या बद्दल अभ्यासणार आहोत. धन्यवाद.